PAN Card : बँकेत खाते उघडण्यापासून ते प्राप्तिकर परतावा भरण्यापर्यंत, पॅन कार्ड हे आजच्या काळात सर्वात महत्त्वाचे दस्तऐवज बनले आहे. कोणत्याही आर्थिक व्यवहारासाठी पॅन कार्ड असणे अनिवार्य आहे. जर तुमच्याकडे अद्याप पॅन कार्ड नसेल, तर आता तुम्हाला कोणत्याही सरकारी कार्यालयात किंवा एजंटकडे फेऱ्या मारण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्या केवळ आधार कार्डच्या मदतीने डिजिटल पॅन कार्ड मिळवू शकता.
आवश्यक कागदपत्रे
- अर्ज करण्यापूर्वी खालील कागदपत्रे जवळ ठेवा.
- ओळख पुरावा : आधार कार्ड किंवा मतदार ओळखपत्र.
- पत्त्याचा पुरावा : वीज बिल, पाण्याचे बिल किंवा टेलिफोन बिल.
- जन्मदिनांक पुरावा : जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला.
पॅन कार्डसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा? (स्टेप-बाय-स्टेप प्रक्रिया)
- स्टेप १ : सर्वात आधी प्राप्तिकर विभागाच्या अधिकृत 'ई-फायलिंग पोर्टल'वर जा.
- स्टेप २ : होमपेजवरील 'क्विक लिंक्स' विभागामध्ये 'इन्स्टंट ई-पॅन' हा पर्याय निवडा.
- स्टेप ३ : तुमचा १२ अंकी आधार क्रमांक टाका. त्यानंतर दिलेल्या अटी मान्य करून 'Confirm' आणि 'Continue' वर क्लिक करा.
- स्टेप ४ : आता तुमच्या आधारशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल, तो प्रविष्ट करा.
- स्टेप ५ : तुमची आधार माहिती तपासा आणि ती मान्य करून पुढे जा.
- स्टेप ६ : अर्ज सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक पोचपावती क्रमांक मिळेल आणि पॅन कार्ड तयार झाल्याचा मेसेज येईल.
पॅन कार्डसाठी किती शुल्क लागेल?
- पॅन कार्डच्या अर्जासाठी खालीलप्रमाणे शुल्क आकारले जाते.
- नवीन पॅन कार्ड : १०११ रुपये (जीएसटीसह).
- दुरुस्ती/माहिती बदलणे : १०२० रुपये (जीएसटीसह).
- ई-पॅन कार्ड : केवळ ६६ रुपये (जीएसटीसह).
वाचा - ६० लाखांचे गृहकर्ज घेताय? हप्त्यासोबतच 'व्याजाचा' हिशोबही तपासा; अन्यथा मोजावे लागतील दुप्पट पैसे
महत्त्वाच्या टिप्स
तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक असणे अनिवार्य आहे, तरच तुम्ही 'इन्स्टंट ई-पॅन' सुविधेचा लाभ घेऊ शकता.
ई-पॅन हे प्रत्यक्ष पॅन कार्डइतकेच वैध असते आणि ते तुम्ही डिजिटल स्वरूपात वापरू शकता.
